' रिती ओंजळ '
एका आयुष्यातून मुक्त झालों कि नवा एक जन्म मिळतो,
अन् परत तोच जूना प्रवास अगदी पून्हा नव्याने घडतो
मूठीत वाटत अगदी पकडून ठेवू ते बालपण परत हरवून जातं,
आणि आयुष्य पून्हा आपल्याला त्याच वळणावर आणून सोडतं
प्रेमाचा अर्थ समजेपर्यंत गुलाबी धुकं विरून जातं,
पहाटेच स्वप्न पून्हा डोळ्यामधून वाहून जातं
एकट पडल्यावर परत जणू जूनाच एक धडा मिळतो,
मुखवट्यांनमागे लपलेला चेहरा हळूच समोर येतो
कित्येक रात्री नशिबाला दोष देण्यात निघून जातात,
डोळे मात्र अजूनही स्वप्न तिचं पहात असतात
कुठे काय चुकलं हे मनं अजूनही शोधत रहातं,
दोन टिप पूसायांला वाटतं कोणी हवं असतं
चालतांना त्याच वाटेवर साथ परत नवी मिळते,
बेधूंद होवून क्षण सारे परत नवी उमेद मिळते
सुखं दू :खाचा लपंडाव असाच खेळ मांडत रहातो,
अलगत मागच्या पानावरून प्रवास पूढे चालत रहातो
आई वडिलांची स्वप्नं आता आपल्या डोळ्यात हसत असतात,
त्याच जागेवर त्याच वाटेवर पावले आपली उभी असतात
इवली इवली सोबतं आतां आभाळाएवढी मोठी होते,
तृप्त होवून जातां जातां ओंजळ मात्र रीती होते …….

No comments:
Post a Comment