सौ. आई व श्री. दादा,
यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाप्रित्यर्थ मी लिहिलेले चार शब्द …
यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाप्रित्यर्थ मी लिहिलेले चार शब्द …
अन् प्रेमाची हि गोष्ट अधिकच खुलली आज
कधी चांदण्यांची साक्ष तर कधी प्रीतीची पहाट
कधी वादळाची सोबत तर कधी रिमझिम निनाद
चढ, उतार, डोंगरघाट अन कधी पाऊलवाट
सांर सारं होत इथवर चालतांना यांत
यश, अपयश, आनंद, दु:ख , कधी त्याग तर कधी तडजोड
अन् कधी अबोला ….
संसारात हे इंद्रधनुष्य नेहमीच सजल
अन् सप्तरंगात समाधान कायमच हसलं
आयुंष्यातील प्रत्येक नातं किती छांन जपलत
प्रत्येक मनांत आठवणींचं एक छानसं कोंदण केलत
मुलांचा आनंद तुम्ही नेहमीच आपला मानलात
अन् अपयशात पाठीवर मायेचा हात ठेवलात
पंचप्राण तुमचे नेहमीच नातवंडात राहतात
दूर आहेत मुले म्हणून डोळेही पाणावतात
उत्साह तुमचा असाच ओसंडत राहू दे
साथ तुमची अशीच एकमेका राहू दे
म्हणतात सात पाऊले चालून सात जन्मांची सोबत मिळते
अन् या सोबतीत आयुष्य असे छांन फूलते ……….
Mast!!!
ReplyDelete