रैना बीती जाए ....
आकाशातला पूर्ण चंद्र , शुभ्र चांदणं आणि जुनी हिंदी गाणी ... हे सर्व सोबत असेल तर लांब कुठंतरी उगाचच मारलेली एक चक्कर जादुई क्षणांच्या आठवणीने दिवसभराचा सगळा शीण घालवते....
आss आss आभी जा
रात ढलने लगी , चाँद छुपने चला ...आss आss आभी जा
तेरी याद में बेखबर, शमा कि तरह रातभर
जली आरजू दिल जलाsss .. आsss आsss , आभी जा
तिसरी कसम मधील हे गाणं.. लता मंगेशकर यांचा आवाज.. 'जली आरजू दिल जला', ऐकतांना आपल्याला सुद्धा व्याकुळ करून जातो...
या चांदण्या रात्री हा एकटेपणा आणि तुझी आठवण... तुझ्या सोबत घालवलेल्या त्या प्रत्येक क्षणाला परत आठवणीत जगतांना हि रात्र सुद्धा पुरेशी नाही ..
सितारों ने मुह फेरकर कहाँ अलविदा हमसफर
चला कारवा अब चला आsss आsss आभी जा ...
या क्षणी तू सोबत असावीस म्हणून मी काय करू.. मी, माझं गाणं , माझं संगीत यातील आर्तता तुझ्यापर्यंत पोचेल का ?..
आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हें
मेरा सुना पडा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते हें ...
तुझ्याविना हे सार सूनं सूनं आहे ... या काळोखात अशा या वेळी मला , तुझ्या आठवणीत बरसणाऱ्या माझ्या डोळयांना सोबत आहे फक्त आकाशातून बरसणाऱ्या या सरींची .... मनाबरोबर डोळेही भिजवणारा पाऊस , आपल्या दोघांच्या आठवणींचा पाऊस .....
बरसे गगन, मेरे बरसे नयन देखो तरसे है मन अब तो आजा
शीतल पवन ये लगाये अगन ओ सजन अब तो मुखडा दिखा जा
तूने भली रे निभाई प्रीत, तुझे मेरे गीत बुलाते हें ....
लता मंगेशकर यांच राणी रूपमती मधील हे अजून एक सुंदर गाणं ... 'ये घडी ना जाये बित ... ' म्हणताना हातातून सुटणाऱ्या त्या क्षणांतील अगतिकता काय सहज व्यक्त होते....
या शांत एकांत वेळी इथे भरून उरलाय फक्त तुझा आभास अन् तुझी आठवण...
आपकी याद आती रही रातभर
चश्म -ए -नम मुस्कुराती रही रातभर .. आपकी याद आती रही ..
रात भर दर्द कि शम्मा जलाती रही .. रातभर
गम कि लौ थरथराती रही .. रातभर
बांसुरी कि सुरीली सुहानी सदा
याद बॅन बन के आती रही.. रातभर .....
गमन मधील छाया गांगुली यांच्या आवाजातील हे गाणं ... बासरीच्या गोडं आवाजात हरवून जावं तशी मी हरवून गेले आहे , तुझ्या आठवणीत ...या आभाळभर उमललेल्या आपल्या आठवणींच्या चांदण्यात ...
तुझ्या पावलांची आहट , तुझा स्पर्श , तो आभास आणि मी ..
जब मै रातों में तारे गिनता हूँ और तेरे कदमों की आहट सुनता हूँ
लगे मुझे हर तारा तेरा दर्पन ....
आए तुम याद मुझे गाने लगी हर धडकन
खुशबू लाई पवन, मेहेका चंदन...
एस. डी. बर्मन यांच संगीत, गीतकार योगेश आणि किशोरकुमार यांचा आवाज .. शब्द, चाल आणि आवाज यांचा सुरेख मिलाफ ..... मिली मधलं हे गाणं एक हळुवार मन उलगडून दाखवतं ...
आसमंत झाकोळून टाकणारा अंधार आणि हळूहळू संपणारी रात्र ... आणि या विरहात वाट पाहणारी ती ... संध्याकाळी दिलेलं वचन विसरून तो मात्र आलाच नाही ...
रैना बीती जाए ... शाम न आए... रैना बीती जाए
शाम को भुला शाम का वादा
संग दिये के जागी राधा ... निंदिया न आए ...
रैना बिती जाए ....
हे शब्द , तो आवाज, सारंगीचे सूर, सुंतुर, बासरी आणि गिटारचा मेळ ... सर्व काही आपल्या मनाचा ठाव घेतं ...
अशा कितीतरी सुंदर गाण्यांनी रात्र मग अशीच उमलते आणि मग आठवणींचं चांदण आभाळभर पसरतं ....