बिग बी ...
डॉक्टर भास्कर बॅनर्जी , इन्स्पेक्टर विजय खन्ना, शेखर, सुबीरकुमार, अमित, जय, राज मल्होत्रा, विकी कपूर, इकबाल , विजय दीनानाथ चौहान, प्रोफेसर सुकुमार सिन्हा, विजय वर्मा , सिकंदर , अँथोनी , बादशहा खान , देबराज सहाय , बुद्धदेव गुप्ता, ऑरो , शेहेनशाह , डॉन ... अशा कितीतरी भूमिकेत तो आपल्याला भेटत राहिला आणि आपण त्याच्यावर प्रेम करत राहिलो !
नीला आसमाँ सो गया" असो किंवा "मै और मेरी तनहाई,अक्सर ये बाते करते हैं ".. त्याच्या आवाजात डोळे बंद करून कितीही वेळा ऐकलं तरी मन कधीच भरत नाही.
"हादसा बनके कोई ख्वाब बिखर जाए तो क्या हो. वक्त जझबात को तब्दील नहीं कर सकता. दूर हो जाने से एहसास नही मरतां, ये मोहोब्बत हें दिलोंका रिश्ता .. ऐसा रिश्ता जों सरहदों में कभी तक्सिम नहीं हो सकता.. तू किसी और कि रातों का हसीं चाँद सही , मेरे हर रंग में शामिल तू हें .. तुझसे रोशन हें मेरे ख्वाब मेरी उम्मीदे.. तू किसी भी राह से गुजरे मेरी मंझिल तू हें ".... त्याच्या आवाजातील माझी एक आवडती कविता !
छू कर मेरे मन को किया तुने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन , दो लफ्जोंकी हें दिल कि कहानी या है मोहोब्बत या हें जवानी , दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे हि तड़पाओगे, कसमें वादे निभायेंगे हम, मित ना मिला रे मन का, तेरे मेरे मिलन कि ये रैना , मैं प्यासा तुम सावन, आए तुम याद मुझे गाने लगी हर धडकन, कभी कभी मेरे दिल में खयाल आतां हें अशी रोमँटिक गाणी जणू त्याच्या साठीच लिहिली गेली आहेत.
गोविंदा बरोबर 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये तर कधी अभिषेक बरोबर 'कजरारे कजरारे' करताना त्याने आपल्याला सुद्धा ठेका धरायला लावला. डॉन २ पाहतांना त्याची सर याला नाही म्हणत प्रत्येक फ्रेम मध्ये तो अजूनच आठवत गेला. पिंक, पिकू , वजीर अशा प्रत्येक नवीन भूमिकेत एक वेगळीच छाप पाडून गेला.
" ये तुम्हारे बाप का घर नहीं पोलीस स्टेशन हें, सिधी तरहा खडे रहो', म्हणणारा जंजीर मधील इन्स्पेक्टर विजय खन्ना , "जाओ पेहेले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे बाप को चोर कहां था", म्हणणारा विजय वर्मा , "मुछे हो तो नत्थुलाल जैसी वरना ना हो ", म्हणणारा विकी कपूर. " जिस तरह गोबी का फुल फुल होकार भी फुल नहीं होता वैसे गेंदे का फुल फुल होकर भी फुल नहीं होतां", म्हणणारा प्रोफेसर सुकुमार .. प्रत्येक रोल मध्ये तो आवडतं गेला.
"पीटर तुम लोग मुझे वहां ढुंढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था".. दिवार मधला हा डायलॉग जितका लक्षांत राहिला तेवढाच तो म्हणतांना खुर्चीवर पाय पसरून बसलेला अन् तोंडात बिडी असलेला निळ्या शर्ट मधला विजय वर्मा सुद्धा .." मैं जानता हूँ के तू गैर हैं मगर यूं हि ", म्हणणारा कभी कभी मध्ये त्या पांढऱ्या कोट मधे जितका आवडला तेवढाच "तेरी रब ने बना दि जोडी तेरी रब ने ", म्हणतं भांगडा करतांना. कधी तो हैदराबादी जाफ्रानी पुलाव करणारा बुद्धदेव म्हणून आवडला तर कधी "माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस" म्हणणारा .. याराना मध्ये "तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना", म्हणतं त्याने आपल्याही डोळ्यांत पाणी आणलं. मुकद्दर का सिकंदर , सुहाग, सिलसिला, त्रिशूल , शराबी, दिवार , शोले याची किती पारायणं केली ते कधी मोजलच नाही. एक मात्र खरं, त्याच्या सारखा फक्त तोच आहे आणि कायम राहील !
आपल्या या लाडक्या सुपरस्टार ला आभाळभर शुभेच्छा !!!