तुझ्या आठवांचा, सोहळा सजावा
पाऊस वेडा, झोकात यावा
अशांत, अधीर कधी
उनाड व्हावा,
मृद्गंधात न्हाऊन,
अल्लड हसावा
पाऊस वेडा, झोकात यावा
रोमांचित, रिमझिम
कधी बेधुंद व्हावा
नि:शब्द राहून,
बरसून जावा
पाऊस वेडा, झोकात यावा
रंग नभी उमलतांच, तुझा भास व्हावा
पाऊस वेडा, झोकात यावा ……
पाऊस वेडा, झोकात यावा
अशांत, अधीर कधी
उनाड व्हावा,
मृद्गंधात न्हाऊन,
अल्लड हसावा
पाऊस वेडा, झोकात यावा
रोमांचित, रिमझिम
कधी बेधुंद व्हावा
नि:शब्द राहून,
बरसून जावा
पाऊस वेडा, झोकात यावा
रंग नभी उमलतांच, तुझा भास व्हावा
पाऊस वेडा, झोकात यावा ……
No comments:
Post a Comment