' शाळेतील वयं '
काही केल्या जात नाहींत
चाळीशीत येऊन पोचलो,
हें अजूनही पटत नाहीं
त्या रस्त्यावरून जातांना,
अजूनही शाळा दिसते
तेव्हा मात्र मन नकळत,
परत मागे जाऊन पोहचते
इतक्या वर्षांनंतरही आठवणी,
साथ मात्र सोडत नाहीत
शाळा सुटली तरीहि का,
मोठ होता येत नाही ?
ऑफिसची ए. सी. गाडी,
खिडकीत बसून मजा नाही
शाळेच्या आपल्या रिक्षाची,
तसूभरही सर नाही
वर्गातील आपल्या बेंच ची,
खूर्चीला या मजा नाही
ऑफिस मधल्या केबिनला,
वर्गाची ती ऊब नाही …….
आयुष्य इतकं छान
इथवर चालत पूढे आलं
झाल गेलं ते सर्व काही
मनामध्ये दाटून आलं
पंचवीशी चाळीशी पेक्षा
शाळेतलचं वय छान होतं
'निरागस' शब्दामधेच
जग सारं संपत होतं …….
No comments:
Post a Comment