' अल्लड पाऊस '
आसमंत चिंब ओले, अल्लड वाहे वारा
मुक्तपणे बरसतो, गर्द मेघांचा हा थवा
अशावेळी आज वाटे, दोघे पावसात जाऊ
आनंदाचे चार थेंब, हळूवार झेलू
ओली हिरवी पायवाट, बरोबर चालू
कोसळणाऱ्या त्याच्यासवे, आपणही गाऊ
निथळणारी झाडंवेली, चिंब पक्षी पाहू
आडोशाला उभे राहून, हात हाती घेऊ
झाडावरच्या घरट्यात, ऊब नवी पाहू
पिलासाठी आपणंही, असे वेडे होवू
क्षण सारे ओंजळीत, साठवून घेऊ
पावसात दोघे जण,परतून येऊ ……