Tuesday, January 11, 2022

 सावली


कसं सांगू तुझ्याविना इथे काय होते, 

आठवांचे गोंदण जुने, नभांत दाटते. 

कधी जीव शहारतो, मन इवले झुरते,

थरथरत्या स्पर्शाचे, डोळी वात्सल्य दाटते !

तुझ्या हाताचा पाळणा, तुझे अंगाईचे बोल 

डोळे मिटताच येते, सारे नजरे समोर.

तुझी कविता स्मरते, रामरक्षा ऐकू येते 

दिवेलागण होताच देव्हाऱ्यात भेट होते !

आता नाही 'आई', आता नाही 'तू' हि 

आम्ही 'सावली' तुमची, आहो एकमेकांसाठी  ...