Saturday, April 4, 2020


गुणगुणते सांज नभी कोवळी कातर 
सखी वाट पाहे दूर चांदण्याला पूर 
मोगऱ्यात गंधाळली ओढ हि तुझी 
रुणझुणती रुणझुणती पैंजणे तुझी 

किणकिणली कांकण अलवार गूज 
निळे तुझे डोळे चिंब लाजून चूर 
मारव्यात भिजूनी खुले सावळी सखी
रुणझुणती रुणझुणती पैंजणे तुझी 

सरसर ती झरझर ती घन गर्द सोहळा 
मोहरला प्रेमाचा क्षण होई बावरा
केवड्याचे रान ओले तव मौन रेशमी 
रुणझुणती रुणझुणती पैंजणे सखी....

रुणझुण ती रुणझुण ती पैंजणे तुझी 
चांदण्यात मोरपिशी आठवण जशी ...