हंपी
सिनेमाचं हे नाव वाचून सिनेमाबद्दल खूप उत्सुकता होती. कारण ट्रेलर मध्ये जी काही फोटोग्राफी आणि लोकेशन्स ची झलक मिळाली होती ती पाहून सिनेमा पाहायचं हे तर नक्की होत.
रोजच्या आयुष्यात फेसबुक आणि whatsapp मुळे आपण सतत सर्वांच्या संपर्कात असतो. आपल्या भावना व्यक्त करण्याकरता smilys वापरतो , comments करतो. पण तरीही एकमेकांसमोर बसून तासनतास गप्पा मारण्यात , चेहऱ्यावरील भाव वाचून एकमेकांना समजून घेण्यात,समजावण्यात जी मजा आहे ती यात नक्कीच नाही.
प्रेमावर विश्वास नसलेली ईशा, वास्तुविशारद असलेला एक महिना होऊनही अजूनही हंपीतच रमलेला कबीर , आणि आपल्या मैत्रिणीसाठी दिल्लीवरून खास हंपीला आलेली गिरीजा .. ईशा कबीर आणि गिरीजा या पात्रांसोबत आपण हंपीत अगदी रमून जातो. एक रिक्षावाला, हातानी विणलेल्या वस्तू विकणारी बाई आणि एक साधू हि सोबतीची पात्र.
अमलेंदू चौधरी यांची कॅमेरा फ्रेम प्रत्येक लोकेशन अजूनच रोमँटिक बनवते, 'अपने हि रंग में', हे राहुल देशपांडेच्या आवाजातील गीत, सिम्पल आणि स्वीट कॉस्ट्यूम्स , छोटे पण अर्थपूर्ण संवाद आपल्याला यांच्या गोष्टींत सामावून घेतात आणि आंपण ईशा कबीर आणि गिरीजा मधेच स्वतःला शोधायला लागतो. हंपी हा एक सिनेमा न राहता एक काव्य होतं ....
एकूण काय तर , आपल्याला सुद्धा असा ब्रेक हवाच