रिसेपशन काउंटर
बारावी झाली तशी नोकरी करत शिकावं असा विचार मनात डोकावू लागला. वाणिज्य शाखा असल्यामुळे सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी पार्टटाइम नोकरी अशी सांगड जमण्यासारखी होती, सगळं काही जुळून आलं आणि डॉक्टर देवधरांच्या क्लिनिक मध्ये मी जॉईन पण झाले.
पेशंटना फोनवर अपॉइंटमेंट देणे, तपासणीनंतर पैसे घेऊन पावती देणे आणि ओपीडी झाली कि त्या दिवसाचे पैसे डॉक्टरांकडे जमा करणे असं साधं सोपं काम होतं. सर लहान मुलांचे आणि मॅडम डोळ्याच्या डॉक्टर असल्यामुळे येणाऱ्या पेशंट्स मध्ये अगदी लहान तान्ही बाळं पण असायची आणि आजी आजोबा सुद्धा. आयुष्याच्या दोन टोकांची खरी ओळख हळूहळू इथेच होऊ लागली. .
डॉक्टर या प्रोफेशन बद्दल त्यावेळी मला कमालीचं आकर्षण, आदर होता, अजूनही आहे आणि इथे तर प्रत्यक्ष दोन दोन डॉक्टरांसोबत काम करायला मिळत होतं. रोज संध्याकाळी ५ च्या सुमारास डॉक्टरांची गाडी यायची. गाडी आली कि वॉचमन काका गेट उघडायचे. मला ते क्लिनिकच्या मी बसायचे त्या जागेवरून स्पष्ट दिसायचे. गाडीतून आधी मॅडम उतरायच्या. प्रिंटेड प्युअर सिल्कची साडी,गळ्यांत मोत्याचा नाजूक सर,कानात कुड्या तर कधी डायमंडच मंगळसूत्र आणि त्याला मॅचिंग डायमंडच कानातल, हातात लेदर ची ब्रँडेड पर्स.सर गाडी पार्क करायचे आणि मग दोघे बरोबर क्लिनिकचा जीना चढायचे. त्या दोघांच्या चेहऱयावर नेहमीच एक समाधान असायचं, तेज असायचं. 'डॉक्टरांकडे पाहून निम्मा आजार जायला हवा ', असं माझे बाबा नेहमी म्हणायचे . बाबांच्या या चौकटीत हे दोघहि किती फिट बसतात , असं मला नेहमी वाटायचं.
हळूहळू लहान मुलांची औषध , इंजेकशन, महिन्याचे डोस याबद्दल माहिती होऊ लागली आणि दुसरीकडे मोतीबिंदू झाला म्हणून येणाऱ्या पेशंटशी ओळख वाढू लागली. मला खूप कुतूहल होतं तेव्हा कि मोतीबिंदूच ऑपरेशन म्हणजे काय ? काय करतात नक्की. एक दिवस मी हे कुतूहल डॉक्टरांकडे व्यक्त केलं. त्यांनी मला मला समजेल अशा शब्दात सांगितलं आणि ' ये उदया सकाळी, जोशी आजींच ऑपरेशन आहेच, पहा मग,' अशी परवानगी पण दिली आणि सकाळी येताना काहीतरी खाऊन ये अशी काळजीपोटी सूचना सुद्धा.
दुसऱ्या दिवशी मी वेळेवर पोहोचले. अनुसूया सिस्टरनी ऑपरेशन थिएटर मध्ये सर्व तयारी केली होती. डॉक्टर आले. आजींना तिथं आणल गेलं. त्यांचं एका डोळ्याचं ऑपरेशन आधी झाल असल्यामुळे त्यांची त्या वातावरणाशी थोडीफार ओळख होती.लोकल ऍनस्थेशियाच दिला असल्यामुळे आजी गप्पा मारत होत्या. डॉक्टर सांगतील तसं सहकार्य करत होत्या. मी मात्र खूप टेन्स होऊन एकूण सारं काही पाहात होते कारण ते सर्व काही माझ्यासाठी वेगळं होतं , नवीन होत.
ऑपरेशन सुरु झालं. काही वेळानंतर मॅडम मला म्हणाल्या 'ये इकडे, आणि पहा या दुर्बिणीतुन'. ज्या गोष्टीची मी इतक्या वेळ वाट पहात होते त्यासाठी त्यांनी बोलावताच मी लगेच पुढे झाले. दुर्बिणीतून पाहिलं खरं पण एका क्षणांत माझ्या लक्षात आलं कि मला काहीतरी होतंय .. चक्कर येतीये का ? हो चक्करच .. असा विचार आला मनांत आणि मी लगेच मागे झाले. दार उघडून बाहेर जावं असा विचार केला आणि दाराकडे गेले हि पण पुढे काय झालं ते समजलच नाही.
मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलच्याच एका रूम मध्ये एका गादीवर झोपले होते. अनुसूया सिस्टर चेहऱ्यावर पाणी शिंपडत होती. बाजूला सर उभे होते. मला 'पाणी पी जरा,' अस सांगून त्यांनी अनुसूयाला चहा आणि बिस्कीट आणायला पाठवलं. मी मात्र खूप ओशाळले. बापरे , आपल्यामुळे चांगलाच सीन क्रीएट झाला तर.'सॉरी डॉक्टर. मला खरंच समजलं नाही काय झालं ते,' असं म्हणताच ते म्हणाले , ' इट्स ओके ... होतं असं. अगं तू पडलीस आणि त्या आवाजानी आजी घाबरल्या , मग काय त्यांना शांत राहा सांगितलं आणि तुला बाहेर आणलं'. असं हसून सांगत त्यांनी मला जरा हसवलं. इतक्यात अनुसूया चहा बिस्कीट घेवुन आली. सर आणि मी चहा घेतला. इतक्यात ऑपरेशन संपवून मॅडम सुद्धा आल्या .' काय गं , काय झालं ?' असं म्हणत बाजूला बसल्या आणि खूप काही अवघडून घेऊ नकोस अशी समजूत काढून 'जा , आजींना भेट , आल्यात त्या रूम मध्ये आणि बोलावतायेत तुला ,' असं सांगून गेल्याही.
खरं तर मला सांगायचं होतं मॅडम ना ,' दुर्बिणीतुन दिसलेला डोळ्यातला रक्ताचा थेंब पाहून मी घाबरले आणि बाहेर यावं म्हणून दाराजवळ गेले सुधा पण चक्कर येऊन तिथेच पडले. मला समजलच नाही, एका क्षणांत झालं सगळं' .. पण मॅडम तर गेल्या. मी माझे शब्द तसेच गिळले आणि आजींकडे गेले ....
पदवी मिळेपर्यंत मी कधी डोळ्यांच्या, कधी दाताच्या तर कधी लहान मुलांच्या डॉक्टरांकडे काम करत गेले . कधी प्रेमाने बोलणारी माणसं भेटली तर कधी कमी लेखणाऱ्या नजरा. कधी शिकता शिकता नोकरी करते म्हणून कौतुकाची थाप मिळाली तर कधी परीक्षेत सुट्टी देऊन सांभाळून घेणारे डॉक्टर सुद्धा भेटले. नवनवीन अनुभव मिळत गेले. त्या काउंटर बसून पावत्या फाडतांना , पैसे घेताना , अपॉइंटमेंट देताना अनेक चित्र विचित्र अनुभव येत गेले पण प्रत्येक ठेच नव्यानं काहीतरी देऊन गेली हे मात्र नक्की.
माझा लहान भाऊ डॉक्टर होण्याची जितकी वाट मी त्या काउंटर बसून पाहिली आहे ना तितकी वाट त्यानी सुद्धा पाहिली नसावी, कदाचित. अजूनसुद्धा जेव्हा जेव्हा मी कोणत्याही डॉक्टरांकडे जाते तेव्हा तेथील रिसेपशन काउंटर पाहून मला मात्र ते जुने दिवस खूप आठवतात, डॉक्टर या शब्दाशी माझी पहिली ओळख तिथेच तर झाली होती.
- कविता