Tuesday, July 21, 2015

' पाऊस '

आसमंत चिंब ओले, भिजे दवांत पहाट 
गंधाळून सारे जाई, कसे रान या धुक्यांत 

येई झुळूक लाजरी, जशी बकुळ नाजूक 
होई हळवे जरासे, मग सावळे आकाश 

स्मरे भेट तुझी माझी, अशा धुंद पावसांत 
रितेपण मग जाई, आठवणींनी ते भरून  !!!