' पोरकेपण '
मोठी स्वप्नं पाहतां पाहतां, का इवलं सुद्धा तुटून जातं
खूप काही नको असतं, जग आपलं छोटंच असतं,
ओंजळभर सुखं मागतां मागतां, झोळीभरून दुःखं मिळतं
डोळ्यांमधील आसवांसोबत सारं सारं वाहून जातं,
मोकळा श्वास घेण्यासाठी, हे आभाळही कमी पडतं
डोळ्यांमधील आसवांसोबत सारं सारं वाहून जातं,
मोकळा श्वास घेण्यासाठी, हे आभाळही कमी पडतं
आपलं आपलं म्हणतां म्हणतां, हे जग क्षणांत परकं बनतं
तिन्ही सांजा होता होतां, फक्त पोरकेपण मागे उरतं ….