' क्षण '
क्षण आठवती सारे, क्षण थांबवले काही
क्षण ओसरले तरीही, क्षण मनात रुतले काही
क्षण मैत्रीचे सारे , क्षण प्रीतीचे काही
क्षण मायेचे हसले, क्षण भाग्याचे काही
क्षण जगण्याचे सारे, क्षण हसण्याचे काही
क्षण थांबले तरीही, क्षण हरवले ते काही
क्षण विसरले सारे, क्षण रुसले ते काही
क्षण अश्रूंचे तरीही, क्षण दाटून आले काही
क्षण यशाचे सारे, क्षण अपयशाचे काही
क्षण रंगांचे तरीही, क्षण स्वप्नांचे काही
क्षण दोघांचे सारे, क्षण प्रेमाचे काही
क्षण विरहाचे तरीही, क्षण सौख्याचे काही
क्षण निसटले सारे, क्षण बरसले काही,
क्षणांत जगतां कळले क्षणांत संपले काही !!!