' पाऊस '
पाऊस,
कधी श्रावणातील उन्हांत,
सर्व पानांत अन् फुलांत
कधी त्या बेधुंद सरींत,
जणू तूझाच आभास
पाऊस,
कधी तुझ्याच सोबतीत,
फक्त आपलाच …
कधी प्रेमाचा तर कधी हळवां,
रोमरोमांत, डोंगरवनांत
पाऊस,
कधी तुझ्याच आठवणीत,
दूर स्वप्नांच्या गावांत
कधी व्याकूळ विरहांत,
बरसे मनसोक्त डोळ्यांत
पाऊस,
कधी तुझ्या अंगणात,
त्या नि:शब्द सरत्या रात्रींत
दिसे अगदी शांत नितांत,
भासे जणू मौनातील साद !!!