' काहीतरी हरवलंय '
खरचं काय हरवलंय
माझं मलाच कळत नाही
खूप शोधलं तरी
काहीसूद्धा मिळत नाही
मनातील हुरहूर आता
मनामध्ये मावत नाही
आठवणीतला तू मात्रं
समोर काही येत नाहीं
पौर्णिमेचा चंद्र खरा, की
मनात दाटलेला काळोख
काही केल्या प्रश्नाचे या
उत्तर अजून मिळत नाही
खरचं काय हरवलंय
माझं मलाच कळत नाही
पाऊसं ऐकता ऐकता
काळीज वेड भरून येत
कुण्याकाळचं पाणी
अलगत आज डोळ्यात येतं
पहिल्या पावसाची पहिली आठवण
मनामधून जात नाही
खूप शोधलं तरी
काहीसूद्धा मिळत नाही
मी मलाच हरवलय
हे माझ मलाच कळत नाही ….